अहमदनगर बातम्या

अरेअरे : ‘त्या’ आगीत अर्बन बँकेच्याशाखेसह किराणा दुकान व जीम खाक

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे एका चार मजली इमारतीला मध्यरात्री विजेच्या शार्टसर्किटमुळे आग लागून या इमारतीमधील किराणा दुकान, अर्बन को.बँक, जिम यांचे सुमारे पाच कोटी पेक्षा जास्त रक्कमेचे नुकसान झाले आहे.

ही आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल पाच ठिकाणच्या अग्नीशामक दलाच्या जवानांनी रात्री बारा ते पहाटे पाचपर्यत अथक प्रयत्न केले. काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास काष्टी येथील कै.बाबा नजु राहिंज संस्थेच्या इमारतीमधील मुनोत यांच्या होलसेल किराणा दुकानाला विजेच्या र्शाटसर्कीटमुळे आग लागल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुनोत यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते.

त्यामुळे काही क्षणातच सर्व इमारतीने पेट घेतल्याने दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या नगर अर्बन बॅकेचे फर्निचर,कॉम्प्युटर, कागदपत्रे, इनर्व्हटर बॅटऱ्या जळाल्या त्याचसोबत तिसऱ्या मजल्यावर असलेली जिमला देखील आग लागून ५० ते ६० लाखाच्या साहित्याचे नुकसान झाले.

ही आग विझविण्यासाठी नागवडे कारखाना, श्रीगोंदा नगरपालिका, दौंड नगर पालिका, कुरकुंभ एमआयडीसी, शिरूर नगरपालिका येथील अग्नीशामक दलाचे जवानानी रात्री बारा ते पहाटे पाचपर्यत पाच तासांच्या अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आणली.

याआगीत बॅकेचे खूप नुकसान झाले असून लॉकर रूमला देखील आगीची झळ बसली आहे. लॉकरमध्ये अनेकांचे दागिने,पैसे,महत्वाची कागदपत्र आदी साहित्य आहेत. मात्र आता दोन दिवसानंतर हे सुरक्षित आहेत की नाही ते समजेल.

Ahmednagarlive24 Office