अर्थव्यवस्थेचा विचार करून तरी मंदिरे उघडा; विखेंनी साधला ठाकरेंवर निशाणा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- राज्यात अद्यापही कोरोनाचे संकट कायम आहे. आजच्या स्थितीला देखील रुग्ण आढळून येत असल्याने अद्यापही धार्मिक स्थळे खुली करण्यात आली नाही.

याच मुद्यावरून भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मंदिरे उघडण्यासाठी झालेल्या आंदोलनांतील भाविकांच्या भावानांचा नसेल तर किमान मंदिरांवर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थेचा विचार करून तरी राज्य सकारने मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतला पाहिजे.

मात्र, ठाकरे सरकार मंदिरे खुली करण्यासंबंधी एवढा हट्टीपणा का करते, हेच कळत नाही,’ असा सवाल माजी मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. तसेच आता धार्मिकतेचा मुद्दा तापला असून १३ ऑक्टोबर रोजी मंदिरे सुरू करण्याच्या मागणीसाठी राज्यव्यापी लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.

याला भाजपने पाठिंबा दिला आहे. तसेच पुढे बोलताना विखे पाटील म्हणाले कि, मंदिरे उघडण्यासाठी अनेकदा मागण्या आणि आंदोलने होऊनही याची दखल घेतली जात नाही. या हट्टी सरकारला आता साईबाबांनीच सदबुध्दी द्यावी. मोठी मंदिरे असलेल्या गावातील अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. याचे गांभीर्य सरकारने लक्षात घेण्याची गरज आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24