अहमदनगर बातम्या

विरोधक तुम्हाला देखील हिशोब मागतील: आमदार राजळे यांची टीका

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2021 :- शेवगाव -पाथर्डी विधासभा मतदार संघात विकासात्मक कामे केली. त्याचा बाराशे कोटीचा हिशोब मला विरोधक मागत आहेत. शहराच्या पिण्याच्या पाणी योजनेसह सव्वाशे कोटीचा निधी पालिकेला विकासकामासाठी मिळालेला आहे.

तुम्हालाही सव्वाशे कोटीचा हिशोब मागतील तेव्हा हिशोब चांगला करून ठेवा असा टोला आमदार मोनिकाताई राजळे यांनी विरोधकांना लगावला आहे.

येथील एका विकास कामाचे उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी बोलतांना आ.राजळे म्हणाल्या की,पाणी योजना धरून सव्वाशे कोटींची कामे पालिकेच्या माध्यमातून होत आहे.

निधीच्या पैशांचा बारीक हिशोब व्यवस्थित पालिका पदाधिकाऱ्यांनी करून द्या. विरोधक परत तुम्हाला हिशोब मागतील. पाणी योजना थोडी बाजूला ठेवा.

पूर्ण झाल्यावर सांगा जसे वारंवार बाराशे कोटींचा हिशोब मागतात तसे विरोधक तुम्हाला सव्वाशे कोटींचा हिशोब मागण्यास कमी करणार नाहीत.

मात्र याने काही फरक पडणार नाही. पाच वर्षात नगरपालिकेच्या टीमने खूप चांगली कामे केली आहे. काही महिन्यातच पालिका निवडणूक लागल्यांनंतर भविष्यात काय होईल ते पाहता येईल.

पण शहराच्या दृष्टीने जी मोठी कामे होती ती मार्गी लागली आहे. शहरच्या विकासाचे अजून छोटी कामे बाकी आहे. मागील निवडणुकीत स्व.राजीव राजळे व पालिकेतील पदाधिकाऱ्यांनी जो शब्द दिला होता. ती मोठी कामे पूर्णत्वाला आले आहेत.

Ahmednagarlive24 Office