आमच्या कामांचे श्रेय विरोधकांनी लाटू नये : आ. राजळे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

भाजपा सरकार सत्तेवर असताना शेवगाव – पाथर्डी तालुक्यात भरीव निधी आणून मागील पाच वर्षांत विकासकामे मार्गी लावली. विकासकांमात कधीही राजकारण न करता कामे करण्यावर भर दिला. मात्र, आम्ही मंजूर केलेल्या कामांचे श्रेय सरकार सत्तेवर आले म्हणुन विरोधकांनी श्रेय लाटू नये.

भाविष्यातील सत्तेतील शासनाची वाटचाल पाहता विकासकामे करून घेण्यासाठी आंदोलने करावी लागतील, असे प्रतिपादन आ. मोनिकाताई राजळे यांनी केले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत आ. राजळे यांच्या विकास निधीतून मंजूर आव्हाणे बु. ते गरडवाडी, या २ कोटी १८ लाख रुपये खर्चाच्या रस्ता खडीकरण व डांबरीकरण कामाच्या भूमिपूजनप्रसंगी आ. राजळे बोलत होत्या.

या वेळी माजी शेवगाव तालुका अध्यक्ष बापूसाहेब पाटेकर, बापूसाहेब भोसले, सुभाष ताठे, आशाताई गरड, संदीप वाणी, महादेव पाटेकर, गणेश कराड, गणेश गरड, मीनाताई कळकुंबे, आदी उपस्थित होते. आ. राजळे पुढे म्हणाल्या, शेवगाव तालुक्यात १५ कोटींची रस्त्यांची कामे करण्यात आली असून, महाआघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर रस्त्याची कामे तसेच शेवगाव -पाथर्डी नळ योजनेच्या कामाला देण्यात आली असली तरी मंजूर कामे त्वरित मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला जाईल.

मागील ५ वर्षांत राजकारण न करता पाटपाणी देण्याची भूमिका घेतली. सत्तेवर आपले सरकार नसल्याने विकासकामांसाठी वेळप्रसंगी आंदोलन कले ज़ाईल. सध्याच्या सरकारची वाटचाल पाहता भविष्यातील योजना सुरू राहतील की नाही, याबाबत शंका आहे.

विरोधक आपण मंजूर केलेल्या कामांचे भूमिपूजन करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असून, ढोरजळगाव ते पाडळी रस्त्याला मंजुरी मिळवून काम सुरू करण्यात येईल.

अहमदनगर लाईव्ह 24