Ahmednagar News : अधिकृत वाळू उत्खननाला विरोध; ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने कोल्हार भगवतीपूर येथील प्रवरा नदीपात्रात सुरू असलेले वाळूउत्खनन, वाहतूक बंद पाडली, तसेच मशीनवरील ऑपरेटर तसेच कामगारांना दमदाटी करून “तुमचे मशीन नदीच्या बाहेर काढा अन्यथा पेटवून देऊ’, अशी धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की बाळु फकिरा कोळगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुणाल दशरथ गायकवाडसह एकूण आठ जणांच्या (सर्व रा. भगवतीपूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

लोणी पोलिस ठाण्यात दाखल फिर्यादीत म्हटले आहे, की या आठ जणांनी हा वाळू उपसा अवैध असल्याचे म्हणून उपशाला विरोध केला. तसेच शासकीय कामकाजात अडथळा आणला.

स्थानिक वृत्तवाहिनीमार्फत व्हीडीओ प्रसारीत करून खोटे, बदनामीकारक वृत्त प्रसारीत केले. याबाबत गु. र. नं. ५६७ / २०२३ नुसार विविध कलमांप्रमाणे लोणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.