रॅपीड टेस्टला विरोध, लोकांमध्ये विनाकारण घबराट !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 : मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे.

शहरातील वॉर्ड नंबर २ मध्ये आढळलेल्या रुग्णांमुळे भीती वाढली आहे. त्यामुळे हा वॉर्ड प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केला आहे. परंतु जनतेची गैरसोय होणार नाही

यासाठी प्रशासनाला आम्ही सर्व प्रकारचे सहकार्य करीत असताना प्रशासन मात्र सहकार्य करीत नसल्याची नाराजी वॉर्ड नंबर 2 मधील नगरसेवकांनी व्यक्त केली.

नगरसेवक मुजफ्फर शेख यांनी रॅपीड टेस्ट ही पूर्णत: विश्वासपात्र नाही. राजस्थान सरकारने त्यावर बंदी घातली आहे. असे असताना जोपर्यंत दुसर्‍या चाचणीचा अहवाल येत नाही

तोपर्यंत एखाद्या रुग्णाला कोव्हिड-19 म्हणून घोषित करणे योग्य नाही. त्यामुळे लोकांमध्ये विनाकारण घबराट निर्माण झाली आहे. असे मत व्यक्त केले. अशा रुग्णांना घरीच होम क्वारंटाईन केले पाहिजे.

दुसर्‍या चाचणीत रुग्ण बाधित आढळला तर त्याला कोव्हिड सेंटरमध्ये नेण्यास आमची हरकत नाही, असे सांगून प्रतिबंधित क्षेत्रातून आणीबाणीच्याप्रसंगी एक रस्ता चालू ठेवण्याची मागणी वारंवार करूनही प्रशासन त्याला प्रतिसाद देत नाही,

असा ठपका ठेवला. प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांच्याशी चर्चा होऊन देखील एक रस्ता सुरू केलेला नाही. त्याठिकाणी ड्युटीवर असलेले पोलीस जनतेला सहकार्य करीत नाही.

लोकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत आहेत. विनाकारण वॉर्ड नंबर 2 बदनाम करू नका, असे नगरसेवक अंजुमभाई शेख यांनी आरोग्य अधिकारी व पोलिसांना सुनावले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24