अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :- पारनेर तहसिल कार्यालयातील पुरवठा शाखा तसेच भारतीय स्टेट बँकेच्या पारनेर शाखेत प्रत्येकी एक जण कोरोना बाधित व्यक्ती आढळून आली आहे. तहसीलदार ज्योती देवरे यांनी ही माहीती दिली आहे.
तहसिल कार्यालयातील पुरवठा शाखा तसेच स्टेट बँकेची शाखा ही दोन्हीही ठिकाणे वर्दळीची असून तेथे नागरीकांचा एकमेकांशी मोठया प्रमाणात संपर्क येतो.
त्या दोन्ही ठिकाणी कोरोना बाधित रूग्ण आढळूनआले असल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान हि माहिती समजताच या दोघांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा शोध घेणे.
व त्यांची तातडीने चाचणी करून घेणे हे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये हि बाब लक्षात घेता या दोन्ही ठिकाणांचे कामकाज बंद न ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच या दोन्ही ठिकाणी योग्य ती काळजी घेत कामकाज सुरु ठेवण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved