अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- ज्या रुग्णालयांनी शासकीय दर निश्चितीपेक्षा जास्त दरांची आकारणी केली, अशा १३ रुग्णालयांना ४३ लाख रूपये संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश मनपाने दिले.
कोरोना बाधित रुग्णांवर उपचारापोटी एक लाखांवर आकारलेल्या बिलांची जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या आॅडिटरमार्फत तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत १७० बिलांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत.
१३ रुग्णालयांना पत्र पाठवून ४३ लाख रुपये संबंधित रुग्णांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश दिले. १७० बिलांमध्ये त्रुटी आढळल्या असल्याने वसुलीची रक्कम मोठी होणार आहे.
शासकीय दरनिश्चितीपेक्षा जास्त दर आकारणाऱ्या रुग्णालयांकडून जास्तीची रक्कम वसूल करून रुग्णांना अदा करण्याबाबत त्रिसदस्यीय समितीने महापालिकेला आदेश दिलेले आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved