अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-जागतिक एडस नियंत्रण दिनाचे औचित्य साधून जिल्हा प्रशासन, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि महाराष्ट्र राज्य एडस नियंत्रण संस्थेचे जिल्हा कार्यालय यांच्या वतीने जनजागृती अभियान आणि कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी विविध विषयांवरील ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
यात एक मिनिटाचा जनजागृती संदेश देणारा व्हीडिओ बनविणे, मेम्स/जीफ फाईल्स बनवणे, सेल्फी विथ स्लोगन आणि मास्क डिझाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १५ डिसेंबरपर्यंत ई- मेल द्वारे स्पर्धेसाठीचा मजकूर, व्हीडिओ पाठविणे आवश्यक आहे.
प्रत्येक स्पर्धेतील तीन विजेत्यांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरविले जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा आणि जिल्हा एडस नियंत्रण व प्रतिबंधक विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिवाजी जाधव यांनी दिली आहे.
व्हीडिओ एक मिनिटांचा असणे आवश्यक असून एचआयव्ही-एडसबाबत जनजागृती, मातेकडून बाळांना होणारा एचआयव्ही संसर्गास प्रतिबंध, स्वताचे एचआयव्ही स्टेटस जाणून घ्या आणि जागतिक एकता आणि सामायिक जबाबदारी विषयांवर हे व्हीडिओ असणे आवश्यक आहे.
याच विषयांवर मेम्स/जीफ फाईल्स बनवण्याची स्पर्धा आणि सेल्फी विथ स्लोगन स्पर्धा असणार आहे. तसेच मास्क डिझाईन स्पर्धेसाठी याच विषयांशी संबंधित डिझाईन मास्कवर असणे आवश्यक राहणार आहे. चुकीचा संदेश दिला जाणार नाही, याची सहभागितांनी नोंद घ्यावी.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी dpoahmednagar@mahasacs.org या ई-मेल पत्त्यावर स्पर्धेसाठीचे साहित्य पाठवावे. स्पर्धेसाठी साहित्य पाठविताना स्वताचे पूर्ण नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, महाविद्यालयाचे नाव व वर्ग नमूद करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved