सलग दुसर्या दिवशी अहमदनगरकरांना दिलासा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या स्त्राव नमुन्यापैकी ५९ व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

यात, सर्जेपुरा(नगर) येथील २३, पाथर्डी तालुक्यातील १५, कोपरगाव येथील १४ व्यक्तीचे चाचणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली.

कोपरगाव येथील बाधित आढळलेल्या महिलेच्या संपर्कातील व्यक्तींचे स्त्राव नमुने काल पाठविण्यात आले होते. त्याशिवाय, पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी येथील काही व्यक्तींचे स्त्राव नमुनेही पाठविण्यात आले होते.

या नमुन्यांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. निगेटिव्ह अहवाल आलेल्या मध्ये राहुरी येथील ०३ आणि अकोले येथील एका व्यक्तीच्या अहवालाचा समावेश आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

अहमदनगर लाईव्ह 24