नालायकपणाचा कळस! गर्भवती महिलेला पाहून आरोग्य सेविका लपून बसल्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :- कोरोनाच्या संकटामुळे गेले अनेक महिने लॉकडाऊन करण्यात आले होते. या आपत्तीजन्य परिस्थितीतही माणुसकी दाखवत नागरिक एकमेकांना साहाय्य करत होते.

मात्र माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना जिल्ह्यात घडली आहे. अकोले तालुक्यातील वारंघुशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उपकेंद्रात मंजाबाई निरंकार लोटे नावाची महिला बाळंतपणासाठी आली असताना

या उपकेंद्रातील आरोग्य सेविका चक्क घरात लपून बसल्या. अखेर गावातील सुईन आणि आशा सेवीका यांनी प्रयत्न केल्यानंतर तीन तासांनी सदर महिलेला नैसर्गिकरित्या डिलेव्हरी झाली.

बाळ आणि बाळंतीण सुखरूप असल्याचे पाहून तेथे उपस्थित असलेल्या सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी व त्या महिलेच्या पतीने सुटकेचा निःश्वास सोडला.ही घटना अकोले तालुक्यातील वारंघुशी येथे घडली.

घटनेची माहिती गावच्या सरपंच अनिता संजय कडाळी व माजी. उपसभापती भरत घाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी आरोग्य कर्मचारी दवाखान्यातील बाथरुममध्ये लपून बसल्याचे निदर्शनास आले.

त्या नर्सचे असे वर्तन त्या बाळंतीणीच्या जीवावर बेतले असते. आणीबाणीच्या प्रसंगी आरोग्य सेविकेने प्रसंगावधानाकडे दुर्लक्ष करत घरात लपून बसल्यामुळे ग्रामस्थांनी या आरोग्य सेविकेला निलंबित करा अशी मागणी केली आहे.

तर या आरोग्य सेविकेचा चौकशी अहवाल तालुका आरोग्य अधिकारी यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेकडे कारवाई साठी पाठविला आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24