…अन्यथा ‘भूईकोट’ किल्लाच ‘भूईसपाट’ होईल !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,17 जून 2020 :  संपूर्ण देशभर प्रसिद्ध असलेला व जागतिक वारसा ठरू शकणारा नगरचा भुईकोट किल्ला राजकीय नेते, तसेच प्रशासनाचे दुर्लक्ष व अनास्थेमुळे भुईसपाट होण्याची भीती निर्माण झाली आहे.

या किल्ल्याच्या बुरुजांवरच मोठे वृक्ष वाढल्याने ही स्थिती ओढवली आहे. एकेकाळी निजामशाहीची राजधानी असलेल्या या शहरातील महत्त्वपूर्ण इतिहास असलेल्या वास्तू व धार्मिक स्थळे यांना भेट देण्यासाठी देश परदेशातून पर्यटक येत असतात.

खरे तर, आपले शहर देशातील महत्वाचे पर्यटनस्थळ होऊ शकते; परंतु याकडे कोणी फारसे गांभीर्याने पाहिले नाही. ही नगरकरांच्या दृष्टीने शोकांतिका आहे.

पंचशताब्दीचा वारसा लाभलेल्या ऐतिहासिक नगर शहरामध्ये अनेक महत्वाच्या ऐतिहासिक व धार्मिक वास्तू आहेत. भुईकोट किल्ला हा तर आपल्या शहराचा गौरव आहे.

भारतातील किल्ल्यांमध्ये जमिनीवरील मजबूत व भव्य किल्ला, असा लौकिक असलेल्या या किल्ल्याच्या अनेक बुरुजांवर मोठमोठे वृक्ष वाढले आहेत.

त्यांची मुळे बुरुजांमधे खोलवर गेली आहेत. त्यामुळे हे बुरुज ढासळण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित पुरातत्व खात्याने, प्रशासनाने याबाबतीत त्वरित कार्यवाही करावी, अन्यथा किल्ल्यासमोर आत्मक्लेश आंदोलन करण्याचा इशारा येलुलकर यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24