….अन्यथा कंत्राटदारावर आत्महत्येची वेळ येईल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- गेल्या पाच वर्षांपासून गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविण्याबाबत केलेल्या कामाची प्रलंबित बिले तातडीने अदा करावीत, याबाबतचे निवदेन राज्य कंत्राटदार महासंघाच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले आहे.

कामे होऊनही गेल्या अनेक वर्षांपासून हि सर्व बिले थकीत आहे, यामुळे मोठ्या आर्थिक समस्या निर्माण होत आहे. हि देयके तातडीने मंजूर करून अदा करण्यात यावी अन्यथा कंत्राटदारांवर आत्महत्येची वेळ येईल,

असा इशारा निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागात दिलेल्या निवेदनात दिला आहे. दरम्यान सदरच्या निवेदनात संघटनेने म्हटले आहे की, जिल्ह्यात २०१५ ते २०२० या वर्षांत २५१५ची अनेक कामे झाली.

या कामांसाठी नियुक्त कंत्राटदारांनी बँकांचे कर्ज काढून या योजनेतील कामे पूर्ण केली. ही सर्व कामे पूर्ण होऊन एक ते दोन वर्षे झाली तरी या कामाचे पैसे शासनाकडून मिळालेले नाहीत.

गेल्या ५ वर्षांत सुमारे ३४ कोटी रुपयांची थकीत बिलाची रक्कम असून, ती तातडीने अदा करावी. अनेक कंत्राटदार बिले मिळत नसल्याने मानसिक तणावाखाली आहेत.

त्वरित ही बिले अदा केली नाही, तर कंत्राटदार आत्महत्या करतील, त्याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या विभागाची असेल, असा इशारा राज्य कंत्राटदार महासंघाने दिला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24