मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही आमच्या महिला सोडणार नाहीत

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी वादग्रस्त वक्तव्याबाबत माफीनामा जाहीर केला असला तरी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशीच ठाम भूमिका भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी घेतली आहे.

देसाई या त्यांच्या कार्यकर्त्यांसह मंगळवारी (दि.१८) दुपारी नगरमध्ये आल्या होत्या. प्रभारी जिल्हा पोलिसप्रमुख सागर पाटील यांच्याशी त्यांनी चर्चा करून इंदोरीकर महाराजांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरला.

दरम्यान पत्रकारांशी बोलताना तृप्ती देसाई म्हणाल्या की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यात लक्ष घालून महिलांच्या सन्मानासाठी पावले उचलावीत.

येत्या आठ दिवसात इंदोरीकर महाराजांविरुद्ध गुन्हा दाखल न केल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही आमच्या महिला सोडणार नाहीत, असा खणखणीत इशाराही त्यांनी दिला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24