श्रीरामपूर तालुक्यात १०२ पैकी इतक्या शाळा सुरू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील १०२ शाळांपैकी ९४ शाळा सुरू झाल्या असून पहिल्या दिवशी २७ हजार ८१० विद्यार्थ्यांपैकी ८४७९ विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली आहे.

श्रीरामपूर तालुक्यात सोमवारपासून इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले आहे.तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १७ शाळा, तर खासगी अनुदानित ५१ व खासगी विनाअनुदानित ३४ शाळा आहेत. त्यापैकी जिल्हा परिषदेच्या १४, खासगी अनुदानित ४८, तर खासगी विनाअनुदानित ३२ अशा ९४ शाळा सुरू झाल्या आहेत.

जिल्हा परिषद शाळेत १ हजार ४४२, तर खासगी अनुदानित शाळेत १९ हजार ८०४ व खासगी विनाअनुदानित शाळेत ६ हजार ५६४ विद्यार्थी नोंद आहे, असे एकूण २७ हजार ८१० विद्यार्थी आहेत.