अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- कोरोनाच्या संकटाशी दोन हात करत असताना महाराष्ट्रापुढे आता बर्ड फ्लूचे संकट उभे ठाकले आहे.
मुंबई, बीड, परभणी, दापोली पाठोपाठ आता नगर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये बर्ड फ्लूने शिरकाव केला आहे. नुकतेच समजलेल्या माहितीनुसार राहुरी तालुक्यातील सडे येथील मृत कोंबडयाचा बर्ड फ्ल्यूचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
त्यामुळे येथील चार हजार कोंबडयाची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. नगर जिल्ह्यात बर्ड फ्लूचा तिसरा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
दरम्यान, कोंबडयाची शास्त्रीय पध्दतीने व्हिलेवाट लावण्यासाठी नगरहून पथक सडे रवाना झाले आहे. जिल्ह्यात बर्ड फ्लूने हळूहळू हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे