अहमदनगर बातम्या

जिल्ह्यासह राज्यभरात साथीच्या आजारांचा धुमाकूळ ; विविध आजारांनी घेतला ‘इतक्या’ जणांचा बळी

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : यंदा जूनमध्येच मान्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावत शेतकऱ्यांसह सर्वांनाच सुखद धक्का दिला. वेळेवर पाऊस झाल्यामुळे सर्वजण आनंदात होते. मात्र नंतरच्या काळात अनेक ठिकाणी संततधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरात देखील मोठ्या प्रमाणात दलदल झाली.

ग्रामीण भागात अद्याप देखील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून राहिल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचसोबाबत या पावसामुळे पावसाळी आजार देखील वाढले. यंदा स्वाईन फ्लूसोबत झिका, मलेरिया, डेंग्यूने राज्यात कहर केला आहे. मागील काही दिवसांपूर्वी चिकनगुनिया, मलेरिया, डेंग्यूची कमी झालेली रुग्णसंख्यादेखील आता झपाट्याने वाढलेली दिसून आली.

राज्याच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षी ७ सप्टेंबरपर्यंत शहरी आणि ग्रामीण भागात स्वाईन फ्लूचे एकूण १६१७ रुग्ण आढळून आले असून त्यापैकी ३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नागपूर आणि नाशिकमध्ये अनुक्रमे प्रत्येकी १६ मृत्यू झाले आहेत. त्याच प्रमाणे मलेरियाचे एकूण १३४१० रुग्ण आढळले असून त्यापैकी ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर डेंग्यूचे १० हजार ५८६ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सर्वाधिक २२७८ डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत, तर ७ सप्टेंबरपर्यंत चिकनगुनियाचेएकूण २६४३ रुग्ण आढळले आहेत. झिकाचे एकूण १२८ रुग्ण शहरी भागात आढळून आले आहेत. तसेच कॉलराचे ४३७ रुग्ण आढळून आले.

यातील तिघांचा मृत्यू झाला आहे. गॅस्ट्रोच्या ११९५ रुग्णांपैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर कावीळच्या ४२६ रुग्णांपैकी एकाचा मृत्यू झाला, लेप्टोच्या ६९५ रुग्णांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे, टायफसच्या आठ रुग्णांपैकी एकाचा मृत्यू आणि जलजन्य आजारांच्या २४४१ रुग्णांपैकी १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

१२५ सेंटिनल केंद्र महाराष्ट्रात मलेरिया तपासणीसाठी ७५ तर डेंग्यूसाठी तपासणीसाठी ५० अशी एकूण १२५ सेंटिनेल केंद्र कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. येथे येणाऱ्या रुग्णांची ओळख पटवून त्यांना तातडीने उपचार देण्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.

Ahmednagarlive24 Office