उसावर ह्या दोन रोगाचा प्रादुर्भाव,शेतकरी हवालदिल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :-  श्रीरामपूर उसावर पांढरी माशी व तांबेरा रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ‘अशोक’च्या कार्यक्षेत्रातील २२ हजार हेक्टरवर आठ ते नऊ लाख टन ऊस आहे.

पांढरी माशी, तांबेरा रोगाने ऊस खायला सुरुवात झाली आहे. ज्या भागात जास्त पाऊस पडतो व हवेत ८०% आर्द्रता असते, त्या भागात अशा प्रकारचे रोग येतात. या रोगामुळे ४०% पर्यंत नुकसान होऊ शकते.

साखर उताराही घटू शकतो. अशोक कारखान्याकडून किड नियंत्रणासाठी मार्गर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. एकरी ५०० मिली न्यूऑन कीटकनाशक व २०० मिली निंबोळी अर्क (१० हजार पीपीएस) २०० लिटर पाण्यात मिसळून

फवारणी करावी किंवा एकरी ५०० मिली प्रोफेनोकॉस किंवा २०० मिली इमीडाक्लोप्रीड व एक किलो १९.१९.१९ या विद्राव्य खताची २०० लिटर मिसळून फवारणी करावी, असे सांगण्यात आले.

तांबेराचा बंदोबस्त करण्यासाठी बुरशीनाशक कॉपरऑक्सिक्लोराईड किंवा साफ अथवा अँट्रॉकॉल पावडर एकरी ५०० ग्रॅम व त्यासोबत एक किलोे १९.१९.१९ हे विद्राव्य खत या प्रमाणात फवारणी करा

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24