संतापजनक : हॉटेल मालकाने छळ केल्याने कर्मचाऱ्याने केली आत्महत्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :-हॉटेल मालकाने काम केल्याचे पैसे न दिल्याने आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याने कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नेवासा तालुक्यात घडली आहे.

नेवासा तालुक्‍यातील सोनई परिसरातील इंदिरानगर झोपडपटटी परिसरात राहणारा तरुण सोमनाथ रतन आढांगळे, वय ३४ वर्ष हा हॉटेल तोरणा येथे काम करत असताना

त्याचे कामाचे दिवस कमी धरुन त्यास कामाचा मोबदला कमी देवून त्याची मोटारसायकल ताब्यात घेवुन आरोपी अनिल पोपटराव शेटे, रा. सोनई, ता. नेवासा

याने वेळोवेळी पैशाच्या देवाणघेवाणीच्या कारणावरुन सोमनाथ आढांगळे या कामगारास जातीवाचक शिवीगाळ करुन दमदाटी करुन मारहाण करणे,

त्याचा मानसिक, शारीरिक व आर्थिक छळ केला या त्रासातून सोमनाथ रतन आढांगळे या तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केली.

या प्रकरणी काल मयत सोमनाथ आढांगळे यांचे वडील रतन रंभाजी आढांगळे रा.वार्ड नं.१, तहसील कचेरीसमोर श्रीरामपूर यांच्या फिर्यादीवरून आरोपी अनिल पोपट शेटे याच्याविरुद्ध सोनई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24