अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी शब्दबध्द केलेल्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह सर्वच पक्षांचे मान्यवर नेते या व्हर्च्युअल रॅलीत सहभागी होणार आहेत.
प्रकाशन सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम सोशल डिस्टसिंगचा नियम पाळुन प्रवरानगर येथील डॉ.धनंजयराव गाडगीळ सभागृहात संपन्न होणार असून, या कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.अशाकेराव चव्हाण, विरोधी पक्षनेते ना.देवेंद्र फडणवीस,
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वच पक्षांचे विद्यमान आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत. पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असलेल्या या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विखे पाटील परिवाराची विनंती मान्य करुन या व्हर्च्युअल रॅलीत सहभागी होणार असल्याचे कळविले आहे.
जिल्ह्यात १४ तालुक्यामध्ये या व्हर्च्युअल रॅलीत सर्वांना सहभागी होता यावे यासाठी प्रवरा परिवाराच्या वतीने करोना नियमावलीचे पालन करुन नियोजन करण्यात आले आहे. तसेच समाज माध्यमांवरही हा सोहळा सर्वांना पाहाता यावा यासाठी विशेष यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे.
प्रवरानगर येथील डॉ.धनंजयराव गाडगीळ सभागृहात संपन्न होणा-या कार्यक्रमास प्रामुख्याने पद्मभूषण डॉ.विखे पाटील यांच्या समवेत काम केलेल्या राज्यातील मान्यवर नेत्याना विशेष निमंत्रीत करण्यात आले आहे. राज्यातील सर्व पक्षांच्या खासदार,
आमदारांना या सोहळ्याचे निमंत्रण पाठविण्यात आले असून, जिल्ह्यातही विविध तालुक्यात सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे यासाठी प्रवरा परिवारातील विविध संस्थाच्या पदाधिकारी व्यक्तिगत भेटी घेवून निमंत्रण देत आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved