स्नेहालय मुळे इसळक आणि निंबळक गावांची पंचक्रोशी सेवातिर्थ बनली– आ. निलेश लंके

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :-स्नेहालय आणि अनामप्रेम या संस्थांच्या एड्स बाधित , लैंगिक शोषित महिला आणि मुले , दिव्यांगांच्या बहुविध पुनर्वसन प्रकल्पांमुळे इसळक आणि निंबळक या गावांची पंचक्रोशी सेवातीर्थ बनल्याचे प्रतिपादन आ. निलेश लंके यांनी आज केले. आपल्या स्थानिक विकास निधीचे उद्घाटन आमदार लंके यांनी स्नेहालयच्या इसळक येथील हिंमतग्राम प्रकल्पात १० लक्ष रुपयांचे सभामंडप बांधून करण्याचे ठरवले.

त्यानुसार हिम्मतग्राम प्रकल्पातील वंचित महिला ,शेतकरी ,ग्रामीण युवक , एडस् बाधीत यांच्यासाठीच्या बहुउद्देशीय सभागृहाचे भूमिपूजन आज आ. लंके यांच्या हस्ते झाले. स्नेहालयाचे मुख्य पालक मिलिंद कुलकर्णी यांनी यावेळी नमूद केले की , हिंमतग्राम प्रकल्प बाबुशेठ भंडारी आणि बाबुशेठ चोपडा या परिवारांनी भूदान केल्याने सुरू झाला. वर्ष २००४ पासून दुर्धर आजारी ३ हजारावर लाभार्थ्यांना या प्रकल्पाने नवजीवन दिले. जगण्यासाठी हिंमतग्राम प्रकल्पाची उभारणी केली.

येथील शेती, पालेभाज्यांची लागवड, दुग्ध व्यवसाय,फलोत्पादन यातून स्नेहालयातील लाभार्थ्यांच्या जीवनशैलीत आणि आरोग्यात गुणात्मक सुधारणा झाली. येथील ३० एकर जागेतील सुविधांचा २५० वंचित महिला आणि मुले लाभ घेतात . इसळक गावचे उप सरपंच अमोल शिंदे म्हणाले की, नोवेल कोरोना१९ च्या महामारीत इसळक – निंबळक परिसरातील वंचित घटकातील मोठ्या समुदायावर उपासमारीची वेळ आली होती.

स्नेहालय परिवाराने या सर्वांना कोरडा शिधा देऊन जगवले. गिव्ह इंडिया आणि इतर संस्थांची मदत घेऊन येथील १२०० वंचित परीवार आणि वयोवृद्धांना प्रत्येकी रुपये ३ हजारांचा आर्थिक सहयोग स्नेहालयाने दिला. त्यातील मदतीचे प्रातिनिधीक स्वरुपात २० धनादेश आ. लंके यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी इसळकचे सरपंच बाबासाहेब गेरंगे, उपसरपंच अमोल शिंदे, सदस्य अड.

योगेश गेरंगे, ग्रामसेवक बद्रीनाथ घुगरे, इसळक सोसायटीचे संचालक पोपट खामकर, सदस्य रमेश गेरंगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्रीपाद भागवत, आ. निलेश लंके प्रतिष्ठानचे, कान्हूर पठारचे अध्यक्ष चंद्रभान ठुबे, प्रगतशील शेतकरी संजय शिंदे, विनायक कोतकर, प्रविण वाळके, बाळासाहेब पानसरे, विजय दिवटे, गणेश रोडे, सामजिक कार्यकर्ते समीर पाटील, संजय हरक चंद गुगळे, राजीव गुजर, विश्वस्त संजय बंदिष्टी, अॅड श्याम असावा, अनिल गावडे, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष हनीफ शेख आणि सदस्य प्रवीण मुत्याल,

तसेच इसळक-निंबळक पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि सामाजिक क्षेत्रातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक अकोलकर, सचिन ढोरमले, संजय चाबुकस्वार, नितीन मोरे, कालिदास खेडकर, राजेंद्र शिंदे, संजय खरात, सुनील मोरे, संदीप देवमाने, अमोल मरकड, विजय गायकवाड, विष्णू कांबळे, योगेश गवळी, विजय वेदपाठक आदींनी परिश्रम घेतले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24