अहमदनगर बातम्या

पाथर्डी शेवगावमधे लवकरच नुकसानीचे पंचनामे होतील : आ. राजळे

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : पाथर्डी -शेवगावमधे दुष्काळी परिस्थीती आहे. दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त म्हणुन यादीत समाविष्ट झाले आहेत. कोरडगाव मंडळाचा समावेश चुकुन राहीलेला आहे तो ही लवकरच होईल.

यासाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. लवकरच कोरडगाव मंडळाचा समावेश दुष्काळी यादीत होईल. तसेच सध्या अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येतील. असा विश्वास आमदार मोनिकाताई राजळे यांनी व्यक्त केला.

अर्थसंकल्प २०२३ अंतर्गत तालुक्यातील सुमारे साडे आठ कोटी रुपये निधीतील विकासकामांचे भूमिपुजन आ. राजळे यांच्या हस्ते झाले त्यावेळी आ. राजळे बोलत होत्या.

यावेळी बोलताना राजळे म्हणाल्या, विधानसभा निवडणुकी नंतर अडीच वर्ष राज्यात विरोधी पक्षाचे सरकार असतांना मतदारसंघाच्या विकासासाठी निधी मिळत नव्हता, मात्र दिड वर्षापुर्वी राज्यात सत्तांतर झाले अन् मोठा निधी प्राप्त होऊ लागला.

सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात व मुखमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भाजपा व मित्रपक्षाचे सरकार आहे.

त्यामुळे मतदारसंघाच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध होत आहे. येणारे वर्ष निवडणुकीचे असुन स्थानिक मतभेद बाजुला ठेवुन सर्वांनी सहकार्य करावे व राज्यात व देशात आपल्या विचाराचे सरकार आणावे. श्रीकांत मिसाळ यांनी सुत्रसंचालन केले. अमोल नलवडे यांनी आभार मानले.

यावेळी माजी जि.प. सदस्य राहुल राजळे, भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, उपाध्यक्ष संजय किर्तने, सुनिल ओव्हळ, बाजार समितीचे संचालक नारायण पालवे, जगन्नाथ खेडकर, अंकुश कासुळे,

दादा पाटील कंठाळी, राजेंद्र उदागे, श्रीधर कंठाळी, राम उदागे, मालेवाडीचे सरपंच आजिनाथ खेडकर, श्रीकांत मिसाळ, बबनराव उवागे, आप्पासाहेब नलवडे, अमोल नलवडे, उत्तमराव नलवडे, रामदास काकडे, वामन किर्तने, नितीन किर्तने, वसंत पवार उपस्थीत होते.

इतर कारखान्याला ऊस देवू नका : आ. राजळे

यावर्षी उस उत्पादन कमी असल्याने व इतर कारखान्याच्या टोळ्या आपल्या कार्यक्षेत्रातुन उस घेवुन जात आहेत. मात्र तालुक्याची कामधेनू श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना अडचणीत आहे. त्यामुळे सभासद, शेतकरी, उस उत्पादक यांनी आपला उस इतर कारखान्याला न देता आपल्याच कारखान्याला द्यावा

Ahmednagarlive24 Office