Ahmednagar News : पाथर्डी, मोहटादेवीचा आशिर्वाद व पाथर्डीकरांच्या शुभेच्छा घेवुन मी माझ्या बीड मतदार संघात जाते आहे. आशिर्वादाला कुठलीच आचारसंहीता नसते. पंकजा मुंडेना धक्का, असे बोलले जाते. धक्के व संघर्षातच माझे जिवन सुरु आहे.
बीडमधे माझी काळजी घेणारे कोणी नाही, अशी खंत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. मुंडे याचे पाथर्डीत जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी खा. सुजय विखे, आ. मोनिका राजळे,
जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले, अभय आव्हाड, अरुण मुंडे, सभापती सुभाषराव बर्डे, डॉ. मृत्युंजय गर्जे, गोकुळभाऊ दौंड, शुभम गाडे, संदीप पठाडे, भगवानराव गर्जे, अशोक गर्जे, अशोक चोरमले, अमोल गर्जे, मुकुंद गर्जे, मंगल कोकाटे, काशीबाई गोल्हार, मनिषा घुले, सुलभा बोरुडे उपस्थीत होते.
यावेळी मुंडे म्हणाल्या, मला सर्वांची काळजी घ्यावी लागते. मात्र बीडमधे माझी काळजी घेणारे कोणी नाही. मात्र जनतेचा आशिर्वादाची शिदोरी माझ्याजवळ आहे. आई मोहटादेवीचा आशिर्वाद घेवुन मी बीड जिल्ह्यात पाऊल ठेवणार आहे.
मी मंत्री असताना परळीसोबत पाथर्डीील विकासाचा निधी दिला होता. आता मी निवडणुकीत येईल तेव्हा बोलेल. तुमचे आशिर्वाद राहु द्या, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी डॉ. सुजय विखे म्हणाले, मीच पंकजाताईना आग्रह केला की पाथर्डीकडुन या. नरेंद्र मोदींनी पंकजाताई मुंडे यांना केंद्रात संधी दिली आहे.
मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी जनतेच्या दरबारात येत आहोत. त्यानंतर मुंडे यांनी मोहटादेवीचे दर्शन घेतले. तेथे प्रदुषण आयुक्त दिलीपराव खेडकर व डॉ. मनोरमा खेडकर यांच्या वतीने मोहटादेवीला केलेल्या नवसाची देवीला मुंडे यांच्या हस्ते चांदीचा मुकुट अर्पण करुन करण्यात आला. यावेळी देवीगडावर देवीभक्त व मुंडे यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.