अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- विद्यापिठाच्या अंतिम परीक्षांचा गोंधळ काही केल्या मिटेना. अनेक संभ्रमानंतर अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरु करण्यात आल्या. काहींना ऑनलाईन तर काहींना ऑफलाईन. परंतु येथेही विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला.
विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना. त्याचे झाले असे, काल अंतिम वर्षाची ऑफलाईन परीक्षा होती. काल दुपारी 1 वाजता सुरू होणारी परीक्षा तब्बल साडेचार वाजता सुरू झाली.
परीक्षेची वेळही दुपारी 1 वाजेची होती. त्याअगोदर सोशल डिस्टन्स, सॅनिटायझिंग असे नियम पाळले जावेत म्हणून महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना 11 वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते.
त्यानुसार ग्रामीण भागातील विद्यार्थी व विद्यार्थिनी सकाळी 11 वाजेपासून महाविद्यालयात उपस्थित होते. परंतु विद्यापिठाकडून या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका न आल्यामुळे सर्वजण गोंधळात सापडले.
दुपारी 1 वाजता सुरू होणार्या परीक्षेची प्रश्नपत्रिका सायंकाळी साडेचार वाजता आली. आता पेपरही रद्द करता येत नसल्यामुळे महाविद्यालयाने उशिरा का होईना काल सायंकाळी साडेचार वाजता परीक्षेस सुरुवात केली.
त्यामुळे हे पेपर सुटण्यास दोन तास लागले. त्यानंतर बहुतांश ग्रामीण भागातील विद्यार्थिंनींना वेळेत बस नसल्यामुळे काल रात्रीपर्यंत ताटकळत बसावे लागले. विद्यापिठाच्या या भोंगळ कारभारामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिंनींना मनस्ताप सहन करावा लागला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved