Ahmednagar News : पालकांनो काळजी घ्या ! अहमदनगरमधून तीन अल्पवयीनांना पळवले, एकीला तर जावयानेच नेले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याचे अनेक धक्कादायक प्रकार घडत आहेत. मागील काही दिवसांचा विचार केला तर अनेक घटना समोर आलेल्या आहेत.

पोलिसांनी यातील अनेकांचा शोधही घेतला आहे. दरम्यान आता जिल्ह्यातून पुन्हा दोन अल्पवयीन मुलींना व एका मुलास पळवण्याची घटना घडली आहे. यातील एकीला तर जावयानेच पळवले असल्याचे समोर आले आहे.

यातील पहिल्या घटनेत कोले तालुक्यातील बारीगाव येथे लग्नातून १७ वर्षाच्या मुलीला पळवून नेले. दुसऱ्या घटनेत श्रीरामपूर तालुक्यातून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलाला पळवून नेल्याचे समोर आले. तर तिसऱ्या घटनेत राहुरी तालुक्यातील संक्रापूर परिसरामधून १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला रविंद्र नावाच्या मावस जावयाने पळवून नेले आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलिसात फिर्याद दिली असून रविंद्र याच्याविरुद्ध गुन्हाही दाखल झाला आहे. मुलींना पळवण्याचे प्रकार हे चिंताजनक असून पालकवर्गात चिंतेचे वातावरण आहे.

अकोले तालुक्यातील बारीगाव येथील नातेवाईकांच्या लग्नामध्ये आलेल्या १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लग्नामधूनच पळवले. याप्रकरणी मुलीच्या आईने राजूर पोलिसात फिर्याद दिली असून त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आलाय.

श्रीरामपूर मधील मालुंजा येथील असलेला १५ वर्षीय अल्पवयीन मुलगा पुण्यात शिक्षण घेत असताना तो नातेवाईकांमधील एका मुलीच्या लग्नाला मालुंज्यात आलेला होता. या लग्नामधून कुणीतरी त्याला फूस लावून पळवून नेल्याच्या संशयातून मुलाच्या वडीलांनी श्रीरामपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल केलाय.

 पालकांत चिंतेचे वातावरण

अशा घटनांमुळे सध्या पालकवर्गांत चिंतेचे वातावरण आहे. अल्पवयीन मुलींना पळवण्याचे अनेक प्रकार घडत असल्याने एक भीतीही आहे. यामध्ये पालकांनी आपल्या पाल्याचे प्रबोधन करावे, जाग्रुती करावी असे आवाहन केले जात आहे. तसेच कॉलेज किंवा इतर ठिकाणी जाताना शक्य असल्यास पालकांनीही सोबत राहावे असा एक सूर सध्या समोर येत आहे.

पोलीस प्रशासनही सजग

अशा घटना वारंवार घडत असल्याने पोलीस प्रशासन सजग झाले आहे. अनेक मुलींचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. अनेक ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून शाळेंमध्ये प्रबोधन वर्गही भरवण्यात येत आहेत.