Ahmednagar News : पारनेर, श्रीगोंदा, कर्जत तालुक्याकडे पावसाने पाठ फिरविली ! कुकडीत इतका आहे पाणीसाठा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : कुकडी प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा १९ हजार ७७ एमसीएफटी (६४ टक्के) इतका झाला आहे. हा पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत ७ टक्के कमी आहे. कुकड़ी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे; मात्र घोड धरणात ३६ टक्केच पाणीसाठा आहे. त्यामुळे घोड धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या आभाळाकडे नजरा आहेत.

कुकडी पाणलोट क्षेत्रात पाऊस पडतोय; मात्र लाभक्षेत्र असलेल्या पारनेर, श्रीगोंदा, कर्जत तालुक्याकडे पावसाने पाठ फिरविली आहे. ऑगस्ट महिना उलटूनही अद्याप लाभक्षेत्रात दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कालव्याच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे.

पावसाचा जोर कमी झाल्याने अर्धा टीएमसी पाण्याचीच आवक २४ तासात धरण प्रकल्पात होत आहे. दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. घोड धरणात पाण्याची आवक सुरू आहे. सध्या घोड धरणात २ हजार १५७ एमसीएफटी (३६ टक्के) पाणी आले आहे. घोड धरणातून पिकासाठी आवर्तन सोडावे, अशी मागणी होत आहे.

येडगाव धरणात १ हजार ८७० एमसीएफटी (९७ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. माणिकडोह धरणात ५ हजार १२१ एमसीएफटी (५० टक्के) इतका उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रात ३४३ मिलिमीटर पावसाची नोंद आहे. वडज धरणात ७२३ एमसीएफटी (६१ टक्के) पाणीसाठा असून पाणलोट क्षेत्रात २४६ मिलीमीटर पावसाची नोंद आहे.

पिंपळगाव जोगे धरणात १ हजार ४४८ एमसीएफटी (३७ टक्के) इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. पाणलोट क्षेत्रात ३६९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. घोड नदीवरील डिंभे ९ हजार ९०४ एमसीएफटी (८० टक्के) इतका उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

पाणलोट क्षेत्रात ३५४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाणलोट क्षेत्रात सध्या जोरदार पाऊस थांबला आहे. येथे सध्या संततधार पाऊस सुरू आहे. विसापूरमध्ये ८० एमसीएफटी ३९ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

येडगाव धरणात १ हजार ८७० एमसीएफटी (९७ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे धरणातील ओव्हरफ्लोचे पाणी कालवा व कुकडी नदीत सोडण्यात आले आहे.

याचा फायदा लाभक्षेत्रातील तलाव भरण्यासाठी होत आहे. तसेच कुकडी नदीकाठच्या शेतकऱ्यांनाही फायदा होईल. खरीप हंगामातील कपाशी, बाजरी, तूर, सोयाबीन आदी पिकांना कालव्याच्या पाण्याचा फायदा होईल.