पारनेरचे सभापती कोरोनाच्या विळख्यातून मुक्त

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात दरदिवशी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र याच बरोबर दिलासादायकबाब म्हणजे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे.

जिल्ह्यात सर्वसामान्यांबरोबरच अनेक नेतेमंडळी देखील कोरोनाच्या विळख्यात सापडले होते. दरम्यान पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांना मागील आठ दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाली होती.

योग्यवेळी उपचार घेतल्यानंतर ते आता पूर्णपणे बरे झाले आहेत. कोरोनामुक्त झाल्यावर शेळके म्हणाले, वेळीच उपचार घेतल्याने या आजारावर आपण सहज मात करू शकतो.

पंचायत समितीमध्ये नेहमी मला जनतेच्या कामासाठी यावे लागत होते. मी भरपूर काळजीही घेतली तरीसुद्धा मला या आजाराची लागण झाली.

माझ्याबरोबर तालुका दूध संघाचे अध्यक्ष राहुल शिंदे यांनाही लागण झाल्याचे निष्पन्न झाले. आम्ही सुपे येथे तात्काळ उपचार घेतले. तसेच आजाराची लक्षणे जाणवल्यावर तात्काळ टेस्ट करून उपचार घेणे हा एकमेव उपाय आहे.

सध्या तालुक्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नागरीकांनी मास्क वापरणे गरजेचे आहे. असेही शेळके म्हणाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24