महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंद आंदोलनात व्यापारी संघटनेचा सहभाग

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :- उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी येथे या घटनेचा निषेध करण्यात आला असून या आंदोलनास व्यापारी संघटनेने पाठींबा दर्शविल्याने दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व दुकान व व्यवहार ठप्प होते.

देवळाली प्रवरा येथे पार पडलेल्या निषेध सभेत माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण , राष्ट्रवादी नेते अजित कदम,शिवसेना शहरप्रमुख सुनील कराळे ,काँग्रेसचे शहराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण ,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष केदारनाथ चव्हाण, नगरसेवक शैलेंद्र कदम,कारखान्याचे संचालक अशोक खुरुद,कामगार नेते नानासाहेब कदम ,

राजेंद्र कदम, अरुण ढुस ,वैभव गिरमे,विश्वास पाटील, शरद संसारे,दीपक पठारे, राजेंद्र लांडगे,कृष्णा मुसमाडे ,कुणाल पाटील ,दीपक कदम, चंद्रकांत दोंदे ,ऋषिकेश संसारे ,शुभम पाटील ,कारभारी होले,कुमार भिंगारे, दगडू सरोदे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

तर राहुरी फॅक्टरी येथील निषेध सभेत शिवसेना शहरप्रमुख विजय गव्हाणे, शांतिचौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन,साई आदर्श मल्टिस्टेटचे शिवाजीराव कपाळे, माजी नगरसेवक प्रदीप गरड, व्यापारी संघटनेचे विष्णूपंत गीते उपाध्यक्ष सुनील विश्वासराव,विकी पंडित, दीपक कदम,आबासाहेब वाळुंज, मुन्ना देसरडा, राजेंद्र छाजेड आदीसह कार्यकर्त उपस्थित होते.