अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- भंडारदरा धरण परिसरातील एका हॉटेलात रविवारी एका हौशी तरुणाच्या वाढदिवसाची जोरदार पार्टी झाली. या पार्टीमुळे हॉटेल मालकासह त्यांचा मुलगा व एका महिलेसह व्यक्तीसह घरातील तब्बल ११ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
यामुळे या पार्टीत सहभागी सुमारे ४० ते ५० उपस्थित लोकांची पाचावर धरण बसली. सोमवारी सकाळी हॉटेल मालकासह घरातील अबालवृद्धास त्रास होऊ लागला.
याची दखल घेऊन तालुका प्रशासनाने तातडीने १०८ रुग्णवाहिकेतून वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष चोळके यांनी त्यांना अकोले व संगमनेर येथे उपचार करण्यासंदर्भात हलवले.
पार्टीत उपस्थित सुमारे ४० व्यक्तींना होम क्वारंंटाइन करण्यात आले आहे. या घटनेमळे भंंडारदरा, शेेंडी परिसरातून खळबळ उडाली असून हा संपूर्ण परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.
तो परिसर सील करण्यात आला आहे. या हॉटेल मालकासह कुटुंबातील इतर पाच व्यक्ती व त्यांच्या संपर्कातील हॉटेलमधील ११ व्यक्ती कोरोना बाधित अाढळून आले आहेत.
या वाढदिवसाच्या पार्टीत शेंडी व भंडारदरा धरण वसाहतीतील (कॉलनीतील) २५ तरुण व इतर असे सुमारे ४० ते ५० लोक उपस्थित होते. प्रशासनाकडून त्यांचा शोध घेऊन संशयास्पद बाधित रूग्णांची चौकशी करून त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved