Ahmednagar Politics : पाथर्डी – शेवगाव मतदारसंघातील पदाधिकारी निवडीला स्थगिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Politics : भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी जिल्हा कार्यकारणी, मोर्चा, आघाडी संघटनेच्या पदाधिकारी निवडी जाहीर करण्यात आल्यानंतर पाथर्डी -शेवगाव मतदार संघातील पदाधिकारी निवडीला स्थगिती देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पदाधिकरी निवडीबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे दिलीप भालसिंग यांनी सांगितले

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे २४ रोजी नगर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यावेळी प्रदेश महामंत्री विजय चौधरी, विभागीय संघटन मंत्री रवि अनासपुरे, प्रदेश उपाध्यक्ष व नगरचे प्रभारी माधव भंडारी यांच्याशी पाथर्डी – शेवगाव मतदार संघातील पदाधिकारी निवडीबाबत चर्चा होणार आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करत लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत पदाधिकारी निवडीबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे भालसिंग यांनी स्पष्ट केले.

तर कारवाई करणार ..

शेवगाव, पाथर्डी येथील तालुकाध्यक्ष पदाच्या निवडी जाहिर केल्या नाहीत. निवडीबाबत निष्ठावंत कार्यकर्त्यांना, लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच तालुकाध्यक्ष निवडी करण्यात येणार आहेत. याबाबत कार्यकर्त्यानी गैरसमज करून घेऊ नये. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत कोणत्याही प्रकारचे पत्रक प्रसिद्ध करू नये. अन्यथा कारवाई करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी दिला.

न्याय, अन्यायाचा विषयच नाही

पदाधिकारी निवडी करताना लोकप्रतिनिधी व निष्ठावंत कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच कार्यकारणी तयार केली. पाचपुते, राजळे आमचे नेते तसेच लोकप्रतिनिधी आहेत. पदाधिकारी निवड करताना अन्याय होईल असे धोरण अवलंबविण्यात आले नाही. लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांशी चर्चा करणे म्हणजे माघार नव्हे, तो समन्वय साधण्याचा भाग आहे असल्याचे भालसिंग यांनी स्पष्ट केले.