भाचेबा तुमच्या मतदारसंघाप्रमाणे मामाच्या मतदारसंघाकडे लक्ष द्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 01ऑक्टोबर 2021 :- भाचे बा तुम्ही मंञी आहात माझंही तुमच्याकडे काम आहे… तुमच्या मागण्या मान्य केल्या. आता आमच्या निधीचाही विचार करा.! पाटील यांनी प्राजक्त तनपुरे यांना गुगली टाकली. “आमच्या इस्लामपूर, आष्टा नगरपालिकेला नगरविकास राज्यमंत्र्यांनी निधी उपलब्ध करून द्यावा.” अशी मागणी त्यांनी केली.

“राहुरी मतदारसंघात जवळपास 200 ट्रान्सफॉर्मर्स बसवले आहेत. तुमच्या मतदार संघाप्रमाणेच आमच्या भागाकडेही लक्ष असू द्या.” अशी मिश्किली जयंत पाटील यांनी केली. धरणाच्या पूर्वेकडील गावांना जोडणार्‍या पुलाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. यात 50 टक्के जलसिंचन व 50 टक्के सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा निधी देऊन हे काम पूर्णत्वास जाणार आहे.

त्याचबरोबर निळवंडेचेही पाणी दोन ते अडीच वर्षात राहुरी तालुक्याच्या शेवटच्या गावापर्यंत पोहोचविण्याची ग्वाही देतानाच बहुचर्चित मुळा नदीवरील देसवंडी बंधारा, मुळानगर फाटा ते मुळा धरण रस्ता या कामाला मंजुरी मिळाली आहे. लवकरच या कामाचाही श्रीगणेशा होणार आहे.

ना. प्राजक्त तनपुरेंच्या पाठपुराव्यामुळे तुमच्या मतदारसंघातील बहुतांशी कामे पूर्ण करून घेतली. आता तुमच्याकडे सहा खाते आहेत. आमच्या इस्लामपूर व आष्टा नगरपालिकेच्या विकासकामांनाही पैसे द्या. विजेच्या रोहित्राबाबत झुकते माप द्या. तुमच्या मतदारसंघाबरोबरच आमच्याही मतदारसंघाकडेही लक्ष असू द्या, अशी मागणी राज्याचे जलसंपदामंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील या मामांनी मंत्री असलेल्या ना. प्राजक्त तनपुरे या भाच्याकडे केली आहे.

ना. पाटील म्हणाले, आमच्याकडे एकच खाते आहे. तुमच्याकडे सहा खाते आहेत. त्यामुळे यापुढील काळात कॅबिनेट ऐवजी राज्यमंत्री व्हावे की काय? अशी मिश्किल टिप्पणी ना. पाटील यांनी केली. राहुरी येथे राष्ट्रवादी परिवार संवाद-पर्व तिसरे या कार्यक्रमांतर्गत ना. पाटील बोलत होते.

यावेळी ना.पाटील यांनी स्थानिक प्रश्नांबरोबरच राज्याच्याही विकास कामांचा आढावा नागरिकांसमोर सादर केला. ना. प्राजक्त तनपुरे म्हणाले, मुळा धरणापलिकडील गावांना जीव मुठीत धरून होडीतून प्रवास करावा लागतो. बोट वारंवार नादुरूस्त होते. त्यासाठी पुलाच्या कामाबाबत आग्रही होतो. त्यासाठी पुलाला त्वरीत मंजुरी दिली. देसवंडी बंधार्‍याचाही प्रश्न मार्गी लागला आहे.

निळवंडे धरणासाठी 545 कोटी रुपये दिले आहेत. पुढील वर्षी 700 कोटी व त्यापुढील वर्षात 700 कोटी रुपये देण्यात येणार असून दोन वर्षांत कालवे व अन्य कामे वेगाने पूर्ण होणार आहेत. वांबोरी चारी टप्पा दोनसाठी बैठक झाली. मुळानगरकडे जाणार्‍या रस्त्याच्या कामाला चालना देण्यासाठी 5 कोटी रुपयांचा आराखडा तयार आहे.

अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी राजेंद्र फाळके, डॉ. सौ. उषाताई तनपुरे, रूपाली चाकणकर, सक्षणा सलगर, संदीप वर्पे, प्रेरणा समूहाचे अध्यक्ष सुरेशराव वाबळे, नगराध्यक्ष अनिल कासार, डॉ. राजेंद्र बानकर, माजी जि.प. अध्यक्ष बाबासाहेब भिटे, रोहिदास कर्डिले, मंजुषा गुंड,

धनंजय गाडे, महेबूब शेख, सुनील गव्हाणे, कैलास पवार, सोमनाथ पवार, विजय कातोरे, युवराज पवार, नंदू तनपुरे, राहुल म्हसे, तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, अनिल इंगळे, नवाज देशमुख, संतोष आघाव, संदीप पानसंबळ, शहाजी जाधव, सुयोग नालकर, धनंजय म्हसे, शारदा खुळे,

माजी सभापती मनिषा ओहोळ, कल्पना भिंगारदे, डॉ. प्रकाश पवार, राजेंद्र जाधव, अपर्णा धमाळ, ताराचंद तनपुरे, रवींद्र आढाव, लोटकेसर, नंदकिशोर पेरणे, बाळासाहेब उंडे, दशरथ पोपळघट, महेश उदावंत, लक्ष्मण म्हसे, संदीप म्हसे, अशोक म्हसे, धीरज पानसंबळ,

दत्तात्रय शेळके, अशोक आहेर, विलास तनपुरे, अ‍ॅड.राहुल शेटे, नितीन बाफना, शब्बीर देशमुख, प्रकाश भुजाडी, अनिल घाडगे, राजेंद्र बोरकर, विजय माळवदे, वृषालीताई तनपुरे, सचिन भिंगारदे, आदींसह नागरिक उपस्थित होते.

यावेळी डॉ.तनपुरे कारखान्याचे संचालक भारत तारडे, गिरीराज तारडे, भाऊसाहेब येवले, नामदेव झावरे, पोपट घनदाट, बाळासाहेब नालकर आदींनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह शहाजी जाधव यांचा सन्मान करण्यात आला.