मनपाच्या तिजोरीत तब्बल ४० कोटी ५० लाखांचा कर भरणा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 :- शहरातील करदात्यांना थकबाकीवर ७५ टक्के शास्तीमाफी देण्याची सोमवारी शेवटची मुदत होती. ही मुदत वाढवण्याची नगरकरांची मागणी लक्षात घेऊन आयुक्तांनी १५ डिसेंबरपर्यंत शास्तीमाफीला रात्री उशिरा मुदतवाढ दिली.

शहरातील ९१ हजार करदात्यांनी तब्बल १९४ कोटींचा मालमत्ता कर थकवला आहे. चालू वर्षातील ४६ कोटींच्या मागणीसह वर्षभरात २३९ कोटी वसूल करण्याचे आव्हान आहे.

कोरोनाच्या संकटामुळे नागरिकांनी कर भरण्याकडे पाठ फिरवली होती. नागरिकांना दिलासा देण्यासाठी मनपाने थकबाकीवर आकारल्या जाणाऱ्या शास्तीत ७५ टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला.

या सवलतीची सोमवारी शेवटची मुदत होती. सोमवारी दिवसभरात तब्बल दीड हजार करदात्यांनी ४ कोटींचा भरणा केला. आतापर्यंत मनपाच्या तिजोरीत तब्बल ४० कोटी ५० लाखांचा कर भरणा झाला आहे. साडेसात वाजेपर्यंतचा हा आकडा आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24