अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:- कोरोनानंतर राज्यावर तसेच जिल्ह्यावर बर्ड फ्ल्यूचे संकट घोंगावत आहे.
नुकतेच जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती, यामुळे संपूर्ण जिल्ह्यात देखील प्रशासन अलर्ट झाले आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील कोकणगाव शिवारात उल्हास दिनकर शिंदे यांच्या शेतात चार मोर मृतावस्थेत आढळले आहेत. त्यामुळे बर्ड फ्ल्यू पार्श्वभूमीवर खळबळ उडाली आहे.
कोळगाव आढळगाव परिसरात मोराची संख्या मोठी आहे. अलिकडच्या काळात ओढ्यानाल्यावर अतिक्रमण वाढले आहे. झाडे, झुडपे कमी झाली आहेत. त्यामुळे मोरांची वसाहत नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
अशा परिस्थितीत कोकणगाव शिवारात चार मोराचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यू पिकांवरील विषारी कीटकनाशकमुळे की शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकल्याने झाला कि बर्ड फ्लूमुळे झाला याचा शोध घेणे आवश्यक आहे.