Ahmednagar News : शहरासह ग्रामीण परिसरात चैत्र महिन्यातच वैशाख वणवा जाणवत असून परिसर उन्हाच्या तीव्र झळांनी होरपळून निघत आहे. आग ओकणाऱ्या सूर्याच्या उष्णतेचा पारा ४० अंशाच्या आसपास पोहचल्याने दुपारच्या वेळी उन्हाच्या काहिलीने नागरिक हैराण होत आहेत.
या वर्षीच्या पावसाने पिके चांगली आली परंतु सध्या वाढत असलेल्या उकाठ्धामुळे पाणी पातळी कमालीची घटत चालली आहे. डोंगरावरील गवत वाळल्याने व जंगलातील पाणवठे आटल्याने वन्य पशु पाण्यासाठी सैरभैर झाले आहेत. निवारा व पाण्याच्या शोधार्थ त्यांची मानवी वस्तीपर्यंत भटकंती सुरु असल्याने त्यांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे.
चैत्रातल्या नवपालखी बरोबरच उहाची दाहकता डोके वर काढत असून उष्णतेची तीव्रता खूपच वाढल्याने रणरणत्या उन्हात दोन पावलेही चालण्याची इच्छा होत नाही. सर्वाच्या उष्णतेपासून बचावासाठी प्रत्येकजण सावली शोधत आहे, परंतु मानवाने केलेल्या बेसुमार वृक्ष तोडीमुळे सावली मिळणे दुरापास्त झाले आहे.
वाढत्या विक्रमी तापमानाचा परिणाम दैनंदिन जीवनावर जाणवत आहे. दुपारच्या वेळी जनावरे झाडांच्या सावलीचा आधार घेत आहेत. ग्रामीण भागातील रस्ते दुपारच्या वेळी निर्मनुष्य होत असल्याने अघोषित संचारबंदी सारखी स्थिती निर्माण होत आहे.
शालेय विद्याथ्यांच्या परीक्षा संपल्यान त्यांनी आपला मोर्चा मामाच्या गावाकडे वळविला असला तरी उन्हामुळे त्यांच्या खेळावर बंधने येत आहेत, परिसरातील शीत पेयाची दुकाने, रसवंती गृहे गर्दीने फुलून गेली आहेत. थंडगार पाणी पिऊन नागरिक आपली तृष्णा भागवत आहेत.
उष्माघातासारखे विकार टाळण्यासाठी प्रशासन व आरोग्य विभागाकडून नागरिकांचे प्रबोधन केले जात आहे. रणरणत्या उन्हातदेखील लग्न समारंभ व ग्रामजत्रांचा उत्साह कमी झालेला नसून उन्हाची पर्वा न करता धुमधडाक्यात हे उत्सव साजरे केले जात आहेत.
पटणारी झाडांची संख्या पशुपक्षांसह मानवी जीवनही अशा ऋतू बदलामुळे विस्कळीत होताना दिसत आहे. रहावी- बारावीच्या परीक्षा संपल्याने विरंगुळा म्हणून विविध छंद जोपासणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आनंदावरही विरजण पडत आहे.
उष्माघात टाळण्यासाठी स्वतः बरोबरच लहान बालकांची काळजी घेणे गरजचे आहे.