अहमदनगर बातम्या

पाण्याच्या टँकरसाठी आमदाराच्या पीएला फोन करावा लागतोय दोन आमदार अन एक खासदार असूनही जनता तहानेने व्याकुळ

Published by
Ahmednagarlive24 Office

 तालुक्यातील अनेक गावात टँकरची गरज असताना भाजपा व सत्ताधारी अद्यापी शासकीय टँकर द्यायला तयार नाहीत. दुसरीकडे आमदार रोहित पवार यांनी काही गावात टँकर सुरू केले आहेत.

मात्र त्यांच्या टँकरसाठी त्याच्या पिए बरोबर संपर्क साधावा लागतो. परंतु त्यांचे पीए कोणाशी नीट बोलत सुद्धा नाहीत. मित्र पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाचे अनेक गावात सरपंच आहेत. त्या गावात त्यांच्या कार्यकर्त्यांना विचारून टँकर दिले जातात. असा आरोप काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण पाटील यांनी केला आहे.

कर्जत तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असताना या परिस्थितीचा आढावा घेण्या साठी टंचाई आढावा बैठक घ्यावी प्रशासनाला प्रश्न विचारावेत असे तालुक्याच्या खासदार व दोन आमदारांना अद्याप वाटलेले नाही.

साध्यच्या राजकीय घडामोडीत त्यांना दुष्काळाचा वा अशी बैठक घेण्याचा विसर पडला आहे.दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात पाण्याचे उद्भव किती आहेत, टँकर कोणत्या गावाला किती लागतील कधी पासून लागतील.

याबाबत कोणतीही नियोजन नसल्याचे पहावयास मिळत आहे. गेले दीड महिन्यापूर्वी ग्रामपंचायतीने टँकरचा प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर केला असून याच्यावर अद्याप कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही.

सद्या प्रशासन सुस्त झाले असून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला असताना त्यावर कोणीच बोलायला तयार नाही. एकीकडे भीषण पाणीटंचाईमुळे तालुक्यातील जनता व्याकूळ झाली असताना दुसरीकडे सध्या फक्त एमआयडीसी या एकाच प्रश्नाभोवती तालुक्यातील राजकारण फिरत आहे.

दोन वर्षापासून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका नसल्याने या दोन्ही स्तरावरील पदाधिकारी नसल्याने गाव पातळीवरील पदाधिकाऱ्यांना आपले प्रश्न मांडायला जागाच शिल्लक नसून कर्जत तालुक्याला सध्या दोन आमदार आहेत खासदार आहेत यामुळे मोठ्या प्रमाणात विकास होईल अशी अपेक्षा असताना लोकांचा मोठा भ्रमनिराश झाला आहे. अशी देखील टीका पाटील यांनी केली आहे.

यामुळे त्यांच्यामागे लागण्यापेक्षा आम्ही काँग्रेसच्यावतीने टाकळीमध्ये आमचा टँकर सुरू केला असल्याचे सांगून दुष्काळी परिस्थितीत आ. पवार यांच्या कार्यपद्धती बाबत पाटील यांनी नाराजी व्यक्त करून याबाबत लवकरच आपण आ. बाळासाहेब थोरात यांचे समोर आमची व्यथा मांडणार असल्याचे म्हटले.

Ahmednagarlive24 Office