अहमदनगर Live24 टीम,22 जुलै 2020 :- मुंबईतील कोरोना रुग्णवाढीचा दर घटला आहे, हे दिलासादायक आहे. दुसरीकडे बहुतेक मुंबईकरांना कोरोना होऊन गेला, मात्र त्यांना त्याची माहितीही नाही,
अशी धक्कादायक बाब एका खासगी प्रयोगशाळेने केलेल्या अँटिबॉडी चाचणीमध्ये समोर आली आहे. एका खासगी प्रयोगशाळेने अँटिबॉडी टेस्ट केली.
त्यामध्ये काही लोकांच्या शरीरात कोरोनाविरोधात अँटिबॉडीज तयार झाल्याचे दिसले. याचा अर्थ या लोकांना कोरोनाची लागण झाली होती.
भाजप नेते आशिष शेलार यांनी याबाबत ट्विट केले आहे. त्यांनी म्हणाले आहे की, “थायरोकेअर लॅबने केलेल्या अँटिबॉडी चाचण्यांमध्ये वरळीत ३२.१५ टक्के,
घाटकोपरला ३६.७ टक्के, सांताक्रुझला ३१.४५ टक्के तर वांद्रे पश्चिमला १७ टक्के जणांना कोरोनाचा संसर्ग होऊन गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.’
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com