अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :-शिर्डित भाविकांच्या ड्रेसकोडसंबंधी एक फलक लावल्याने चांगलाच वाद रंगला आहे. हा फलक हटवण्याची मागणी करत या निर्णयाविरोधात भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आक्रमक झाल्या आहेत.
आता कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी देखील रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. “मंदिरात जाताना कोणते कपडे घालावेत, हे आपल्या देशाची संस्कृती सांगते.
लोकांना ही गोष्ट कळते. मंदिरात जाताना कोणत्या प्रकारचे कपडे घालावेत हे भाविकांना सांगण्याची गरज नाही असे पवार यांचे म्हणणे आहे.
असे असूनही मंदिरात फलक लावणे योग्य नाही. आपण कसे वागावे हे आपले संविधान आपल्याया सांगते. संविधानाच्या पलीकडे जाऊन आपली संस्कृतीसुद्धा आपल्याला वर्तनाबाबत मार्गदर्शन करत असते. अशा परिस्थितीत मुद्दाम कोणी बोर्ड लावत असेल, तर ते योग्य नाही अशी भूमिका रोहित पवार यांनी मांडली आहे.
येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी शिर्डी साई संस्थानकडून ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. मंदिरात येताना भक्तांनी सभ्य पोषाख परिधान करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून भक्त छोटे कपडे घालून मंदिरात येत असल्याची तक्रार आहे त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं संस्थानकडून सांगण्यात आले.