शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत तसेच राज्याचे कुटुंबप्रमुख म्हणून त्यांनी मागील काळात केलेल्या कामाचीच राज्याला खऱ्या अर्थाने गरज आहे अशी तमाम शिवसैनिकांची भावना आहे आणि तेच महाराष्ट्राला पुन्हा एकदा प्रगतीच्या वाटेवर आणतील.
तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी सर्व शिवसैनिक जोमाने कामाला लागले असून उध्दव ठाकरे हेच पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असा विश्वास पारनेर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यांनी व्यक्त केला.
उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील विविध गावांत आयोजित कार्यक्रमप्रसंगी डॉ. पठारे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडी तालुकाप्रमुख प्रियंका खिलारी, युवासेना तालुकाप्रमुख अनिल शेटे, जेष्ठ नेते डॉ. भास्करराव शिरोळे, टाकळी ढोकेश्वर गटप्रमुख धनंजय निमसे, उपनगराध्यक्ष राजू शेख, माजी पं. स. सदस्य पोपट चौधरी, हभप विलास महाराज लोंढे, महिला उपतालुकाप्रमुख कोमलताई भंडारी, विभागप्रमुख सखाराम उजघरे,
चेअरमन बाबा रेपाळे, पारनेर युवासेना शहरप्रमुख मनोज व्यवहारे, टाकळी ढोकेश्वर युवासेनागटप्रमुख अक्षय गोरडे, ढवळपुरी गटप्रमुख आयुब शेख, अळकुटी गणप्रमुख संतोष साबळे, बाजार समिती संचालक बाबासाहेब नव्हे, किसन सुपेकर, ग्रा.स. शुभम गोरडे, युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश रोहोकले, युवासेना उपतालुकाप्रमुख नागेश नरसाळे, सुयोग टेकुडे, ज्ञानेश्वर औटी,
बाळासाहेब भनगडे, राहुल मोरे, आदिनाथ कदम, मोहित जाधव, प्रशांत निंबाळकर, अक्षय फापाळे, संदीप आवारी, भाऊसाहेब टेकुडे, उद्योजक प्रमोद पठारे, डॉ. बाळासाहेब पठारे, संदीप कोरडे, शिवाजी दळवी, मोहन पवार, नागेश नरसाळे, दत्ता टोणगे, किसन चौधरी, संतोष रोकडे, दौलत सुपेकर, महेंद्र पांढरकर, सुभाष भोसले, संदीप भंडारी, शरद घोलप, शरद आवारी, संपत लामखडे, विठ्ठल जाधव आदींनी पारनेर तालुक्यातील विविध ठिकाणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने सामाजिक कार्यक्रम घेतले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने मशाल यात्रा तसेच शिवसंवाद मेळावे व भगवा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने ठीकठिकाणी सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे.
ढवळपुरी, भाळवणी, पारनेर, सुपा, आळकुटी, रांधे, देसवडे, हिवरे कोरडा, निघोज, टाकळी ढोकेश्वर या ठिकाणी आरोग्य शिबिर, शालेय विद्याथ्यर्थ्यांना खाऊ वाटप, शालेय साहित्य वाटप, वृद्धाश्रमातील वृद्धांना किराणा वाटप, वृक्षारोपण आदी उपक्रम राबविण्यात आले