अहमदनगर बातम्या

अहमदनगर शहरात जनतेचा सरकार विरोधात संताप ! महिलांना अक्षरश: सरकारच्या नावाने नाके मुरडली

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

केंद्र व राज्य सरकारच्या पोकळ व बोलघेवड्या योजनांची जनतेसमोर पोलखोल करण्यासाठी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्यावतीने शहरात सुरू असलेल्या होऊ द्या चर्चा! अभियानाला सर्वसामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

शहर शिवसेनेच्या वतीने या अभियानाच्या माध्यमातून भाजपने केलेल्या घोषणा, महागाई, बेरोजगारी, महिलांचे प्रश्‍न, शेतकरी आत्महत्या आदी विविध प्रश्‍न जनते समोर मांडल्या जात आहे. तर या सर्व विषयांवर सर्वसामान्य जनतेचा भाजप विरोधातील संताप व्यक्त होताना दिसत आहे.

नुकतेच रेल्वे स्टेशन येथील इंगळे वस्ती मध्ये होऊ द्या चर्चेत शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम यांनी महिलांशी संवाद साधला. गॅसच्या टाकीवर पूर्वी व सध्याचे गगनाला भिडलेले भावाची माहिती देताच महिलांचा पारा चांगलाच चढला. भाजपने अच्छे दिनाच्या नावाखाली जीवन जगणेच अवघड केल्याची प्रतिक्रिया महिलांनी दिल्या.

यावेळी महापौर रोहिणीताई शेंडगे, नगरसेवक प्रशांत गायकवाड, नगरसेविका सुवर्णाताई जाधव, विद्याताई खैरे, योगीराज गाडे, दिपक खैरे, संतोष ग्यानप्पा गौरव ढोणे, डॉ. श्रीकांत चेमटे, आजिम शेख, अन्वर सय्यद, पप्पू लांडगे, संजय धीवर, विकी खराडे, राजेश मगर, उत्तम इजगत, बंटी खैरे, काका अवचर, संजय गायकवाड, विजया खराडे, शबाना शेख, वैशाली पारखे, मोनिका धीवर, पूजा सोनवणे, रेखा गायकवाड, सुनिता बडगर, सुमय्या शेख, अलका यादव, हिराबाई धीवर, आफरीन शेख, अर्चना इजगज, भारती शेंगदाळे, रुपाली जगताप, शिरीन शेख आदींसह परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

संभाजी कदम म्हणाले की, अच्छे दिनची घोषणा करणाऱ्या भाजप सरकारने फक्त सर्वसामान्यांना महागाईने होरपळून ठेवले आहे. सुशिक्षित बेरोजगार युवकांचा प्रश्‍न सोडविण्या ऐवजी राज्यात खाजगीकरण व कंत्राटी करणाचा शासन निर्णय काढून भावी पिढीचे भवितव्य धोक्यात आणले गेले आहे. शिक्षणाचे खाजगीकरण करुन सर्व व्यवस्था भांडवलदारांच्या दावणीला बांधण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

देशातल्या भाजप सरकारला चले जावो म्हणण्याची वेळ आली आहे. विरोधी पक्षातील नेत्यांना ईडीचा धाक तर फोडाफोडीचे राजकारण करुन सत्ताकाबीज करण्याचे काम भाजपने केले आहे. सर्वसामान्य जनताच बोलघेवड्या सरकारला उखडून टाकणार आहे. जाहिरातीवर केला जाणारा कोट्यावधीचा खर्च कमी केला तर गोरगरिबांच्या कल्याणकारी योजना मार्गी लागणार असल्याचेही कदम यांनी यावेळी सांगितले.

डॉ. चेमटे यांनी गेल्या नऊ वर्षात केंद्र सरकारने केलेल्या पोकळ घोषणा व आश्‍वासनांची खैरातची माहिती दिली. तर त्याचा प्रत्यक्षात फायदा नेमका कुणाला झाला?, पंतप्रधानांच्या योजना प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचल्या का?, महागाई आटोक्यात आली का? असे अनेक प्रश्‍न उपस्थित करुन नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या. यावेळी महिलांना अक्षरश: सरकारच्या नावाने नाके मुरडली. तर भाजपचा खोटारडेपणा व बोलघेवड्या योजनांचा पोलखोल करणाऱ्या पत्रकाचे उपस्थितांना वाटप करण्यात आले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24