अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- अकोल्याचे लोकप्रतिनिधींकडून माझ्या आमदारकीच्या कालावधीत मी मंजूर करून आणलेल्या निधीतून तालुक्यात झालेल्या व होत असलेल्या विकास कामांची उद््घाटने व भूमीपूजन करण्याचा सपाटा सुरू आहे.
वास्तविक एक वर्षापासून या तालुक्यासाठी विद्यमान आमदारांकडून फक्त ८० लाख रुपयांपर्यंतचा निधी मंजुरी मिळाली. त्यापैकी ५० लाखांचा निधी कोविड परिस्थितीवर मात करण्याबाबत आरोग्य विभागाकडे वर्ग केला.
त्यामुळे त्यांनी उर्वरित ३० लाखांच्या विकास कामांची उद््घाटने करून जरूर श्रेय घ्यावे. पण मी आमदार असतानाच्या काळात तत्कालीन सरकारकडून मंजूर करून आपलेल्या निधीतून होत असलेल्या
विकास कामांची उद््घाटने करून खोटे श्रेय घेऊ नये, असा टोला भाजपचे नेते व माजी आमदार वैभव पिचड यांनी आमदार डॉ. किरण लहामटे यांना पत्रकार परिषदेत लगावला.
अकोले नगरपंचायत हद्दीतील १७ प्रभागातून ६ कोटी १८ लाख रुपयांच्या ६२ विकास कामांच्या भूमीपूजन व उद्घाटनानंतर नगरपंचायत कार्यालयात बुधवारी दुपारनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार पिचड यांनी ही टीका केली.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे जिल्हा, उपाध्यक्ष गीरजाजी जाधव, नगराध्यक्ष संगीता शेटे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, नगरसेवक परशुराम शेळके, सुरेश लोखंडे, कल्पना चौधरी, शबाना शेख, अनिता गायकवाड, नजीम शेख, हितेश कुंभार उपस्थित होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved