दुर्बिणीद्वारे कावीळ कमी करण्याची शस्त्रक्रिया सुरू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- शहरातील पोटविकार तज्ञ डॉ. राजेंद्र गुंजाळ यांच्या गुंजाळ पोटाचे हॉस्पिटल येथे नेहमीच अद्यावत आणि आधुनिक आरोग्यसेवा जिल्ह्यातील रुग्णांना मिळत आहे. त्यातच डॉ. गुंजाळ यांनी जिल्ह्यात प्रथमच ईआरसीपी म्हणजे दुर्बिणीद्वारे कावीळ कमी करण्याची शस्त्रक्रिया सुरू केली आहे.

ही शस्त्रक्रिया विना टाक्याची असून, पित्तनलिकेतील अडथळ्यामुळे होणारी कावीळ या शस्त्रक्रियेने कमी करता येत असल्याची माहिती डॉ. गुंजाळ यांनी दिली. पित्तनलिकेतील खडे, पित्तनलिकेचा कर्करोग, स्वादुपिंडाचा कर्करोग, पित्ताशयाचा कर्करोग, पित्ताशयातील खड्यांमुळे होणारी कावीळ या शस्त्रक्रियेद्वारे कमी होते.

यापूर्वी या शस्त्रक्रियेसाठी जिल्ह्यातील सर्व रुग्णांना मुंबई, पुणे किंवा औरंगाबाद येथे जाऊन उपचार घ्यावे लागत होते. अशा रुग्णांना आता ही सुविधा नगरमध्ये नगर-पुणे महामार्ग, स्वस्तिक चौक येथील गुंजाळ पोटाचे हॉस्पिटल येथे उपलब्ध झाली आहे. यापुर्वी डॉ. गुंजाळ यांनी नगरमध्ये प्रथमच सीएमओएस टेक्नॉलॉजीने एण्डोस्कोपीची सुविधा सुरू केलेली आहे.

अद्यावत तंत्रज्ञानाने रुग्णांवर उपचार करुन त्यांना बरे करण्यासाठी डॉ. गुंजाळ यांचा नेहमीच पुढाकार असतो. जिल्ह्यात प्रथमच सुरु झालेल्या ईआरसीपी सुविधांचा लाभ गुंजाळ पोटाचे हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना मिळत आहे. चौकट- नुकतेच निमोणे (ता. शिरुर, जि.पुणे) येथील 60 वर्षीय महिला काविळच्या आजाराने त्रस्त होती.

सदर महिलेने गुंजाळ पोटाचे हॉस्पिटलला भेट देऊन उपचार सुरु केले. तिला स्वादुपिंडाच्या कर्करोग झाल्याचे निदान झाले. अशा परिस्थितीत डॉक्टर गुंजाळ यांनी ईआरसीपी शस्त्रक्रियेद्वारे त्यांची कावीळ कमी केली. यामुळे रुग्ण महिलेला होणारा त्रास कमी झाला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24