अहमदनगर Live24 टीम,13 सप्टेंबर 2020 :-माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियान राज्यात सर्वप्रथम संगमनेर तालुक्यात राबवले जाणार आहे. गाव, वाडी-वस्तीवरील प्रत्येकास आरोग्य शिक्षण दिले जाणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान तालुक्यात प्रभावीपणे राबवा, अशी सूचना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी केली.
अमृत कला मंच येथे जि. प. व पं. स. सदस्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे, सभापती मीरा शेटे, सुनंदा जोर्वेकर, नवनाथ आरगडे,
अजय फटांगरे, डॉ. हर्षल तांबे, रामहरी कातोरे, मिलिंद कानवडे, बी. आर. चकोर, प्रांताधिकारी शशिकांत मंगळुरे, तहसीलदार अमोल निकम,
नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, गट विकास अधिकारी डॉ. सुरेश शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, डॉ. संदीप कचोरिया, पोलिस निरीक्षक अभय परमार, सुनील पाटील आदी उपस्थित होते.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved