अहमदनगर बातम्या

रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचे फोटो सोशल मीडियावर टाकले; सरपंच पतीने तरुणास मारहाण करून दिली ‘ही’ धमकी

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : गावच्या सरपंचास ग्रामीण भागाच्या विकासाचा केंद्रबिंदू समजले जाते. मात्र सध्या अनेक ठिकाणी महिला सरपंच आहेत. त्यामुळे गावच्या कारभारात त्यांचे पतीराज लुडबुड करत असतात.

पत्नीच्या नावे स्वतःच करत असतात. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचे फोटो सोशल मीडियावर टाकल्याने सदरचे काम करणारे ठेकेदार तथा सरपंच पतीने संबंधीत तरुणास जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना राहुरी तालुक्यातील टाकळीमिया या गावात घडली आहे .

याबाबत अधिक माहिती अशी, राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील रस्त्यांवर केंद्र सरकारचा कोट्यवधी रुपये खर्च करुन रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले. निकृष्ट दर्जाचे काम केल्याने अवघ्या दोन ते तीन महिन्यात रस्त्यावर मोठमोठे खड्डेड् पडले आहेत.

याच खड्ड्यांचे फोटो गणेश दिलीप तोडमल या तरुणाने सोशल मीडियावर टाकल्याने टाकळीमियाचे सरपंच पती तथा ठेकेदार व सरपंच पत्नीने भ्रमणध्वनीवरुन संपर्क करुन शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली.

याबाबत गणेश तोडमल या तरुणाने टाकळीमियाचे सरपंच लिलाबाई चंद्रकांत गायकवाड व सरपंच पती व ठेकेदार चंद्रकांत मोहन गायकवाड यांच्या विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

टाकळीमिया व देवळाली प्रवरा ते मुसळवाडी या रस्त्याचे ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याने खड्डे पडले आहेत. सोसायटीजवळील अंगणवाडीत चिमुकले विद्यार्थी याच खड्ड्यातील पाण्यातून वाट शोधीत अंगणवाडीत जातात.

कोट्यवधी रुपये खर्च करुन हेरस्ते खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले होते. ग्रामस्थ या नात्याने रस्त्यावरील खड्ड्यांचे फोटो व्हायरल केले. त्यावरुन टाकळीमियाचे सरपंच चंद्रकला गायकवाड व सरपंच पती तथा ठेकेदार चंद्रकांत मोहन गायकवाड यांना राग आल्याने गणेश तोडमल यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी देण्यात आली.

सरपंच व सरपंच पती यांनी ग्रामस्थाला अरेरावीची भाषा वापरीत जिवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने निषेध करण्यात आला.

Ahmednagarlive24 Office