पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना २०२३-२०२४ च्या खरीप हंगामामधील सोयाबीन व मका, या पिकांना ज्या प्रमाणे प्रधानमंत्री पिक विमा योजनेची अग्रीम रक्कम देण्यात आली,
त्याचप्रमाणे बाजरी, मूग व कांदा, पीकउत्पादक शेतकऱ्यांनाही पीक विमा योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी भाजपाच्या प्रदेश कार्यकारणीचे सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
तालुक्यातील बाजरी, मूग व कांदा, या पिकांचे काही ठिकाणी पाऊस न झाल्यामुळे तर काही ठिकाणी अवेळी झालेल्या गारपिटीमुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा योजनेची अग्रिम रक्कम देण्यात यावी, याबाबतचे निवेदन जिल्हा कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
कोरडे यांच्या प्रयत्नांमुळे तालुक्यातील सोयाबीन व मका उत्पादक शेतकऱ्यांना पीकविम्याची १६.०५ कोटी रुपये अग्रिम रक्कम मिळाली आहे. कोरडे यांनी बाजरी, मूग व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना
पीकविम्याची अग्रिम रक्कम देण्याची मागणी केल्यामुळे तालुक्यातील नैसर्गिक अनियमिततेमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.