Ahmednagar News: नगर तालुक्यामधील पिंपळगाव माळवी आणि वडगाव गुप्ता गावातील शेतकऱयांचा २०११ पासून प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे. मौजे बडगाव गुप्ता ब पिंपळगाव माळवी येथील अधिसूचनेच्या अनुसूचित उल्लेखिलेल्या क्षेत्र औद्योगिक क्षेत्राच्या (नगर एमआयडीसी) विकासासाठी आवश्यक नाहीत.
असे राज्य शासनाचे मत झालं आहे. पोट कलम (३) कलम २. खंड (ग) अन्वये प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून महाराष्ट्र जनरल नलसिला (१९०४ या संदर्भ महाराष्ट्र शासन याद्वारे खालील उल्लेख केलेल्या या गोष्टी झाल्या आहेत का या गोष्टी करायच्या आहेत.
महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ व प्रकरण सहा दि.३ मार्च २०२३ पासून करीत आहे. आणि सदर क्षेत्र हे जाहीर केलेल्या औद्योगिक क्षेत्राचा (नगर एमआयडीसी )चा भाग राहणार नाही. राज्यपालांचे आदेशानुसार किरण जाधव, शासनाचे अप्पर सचिव यांनी अधिसूचना काढल्याची माहिती आ.तनपुरे यांनी दिली.
मौजे वडगाव गुप्ता व पिंपळगाव माळवी येथील ४६१.७४ हेक्टर क्षेत्र विना अधिसूचित करण्यासाठी सह मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत दि.२४ सप्टेंबर २०२१ रोजी स्थळ पाहणी दौरा पार पडला. या दोन्ही गावचा हा जिव्हाळ्याचा विषय होता.
यासंदर्भात अनेक शेतकरी बांधव गेल्या दहा अकरा वर्षापासून पाठपुरावा करत होते. शेतकरी बांधवांचा आग्रह आणि या विषयाची गंभीरता लक्षात घेऊन आमदार प्राजक्त तनपुरे यांनी या प्रश्नाला न्याय देण्याचा बिडा उचलला.
त्या अनुषंगाने दि.१५ जून २०२१ रोजी तत्कालीन उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे व विद्यमान सरकार मधील उद्योग मंत्री उदय सामंत यांचीही भेट घेऊन याबाबत पाठपुरावा केला होता. यांच्यासमवेत झालेल्या बैठकीमध्ये सदर क्षेत्र विना अधिसूचित करण्यासाठी हाय पावर कमिटी नेमण्याचा निर्णय झाला.
याला अनुसरून दि.२४ सप्टेंबर २०२१ रोजी हाव पावर कमिटीचा पाहणी दौरा पार पडला. गेल्या दहा अकरा वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावण्यासाठी आ.तनपुरे यांचा पुढाकार कामी आला. या अत्यंत गंभीर प्रश्नाची उकल होत असताना आ.तनपुरेच्या प्रयत्नाने नवसंजीवनी मिळाल्याचं समाधान शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाले. पिंपळगाव माळवी येथील रघुनाथ झिने, रामनाथ झिने,
जालिंदर गुंड, मनोज लहारे, अप्पा जाधव, वडगाव गुप्ता येथील प्रकाश डोंगरे, जालिंदर डोंगरे , सुभाष ढेपे ,कदम माऊली, शेवाळे सर, विजय डोंगरे ब सर्व स्तरातून ग्रामस्थ आभार व्यक्त करत आहेत.