Ahmednagar News : यंदा वातावरणाचे चक्र फिले आहे असे प्रत्येकाच्या तोंडी येत आहे. एल निनो वादळाचा हा परिणाम असावा असा अंदाजही व्यक्त होत आहे. पावसाळा संपून हिवाळा लागला अन गुलाबी थंडी हवीहवीशी वाटू लागली.
परंतु थन्डी पडण्याआधीच अवकाळी पावसाने हजेरी लावली. अहमदनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रात विविध भागात काल (दि.२६) जोरदार पाऊस झाला. अकोले, राहाता, राहुरी, कोपरगाव, नगर शहर व नगर तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली.
* कुठे ख़ुशी कुठे गम
पावसाने अनेक ठिकाणी नुकसान झाले तर काही ठिकाणी शेतीला फायदा झाला. त्यामुळे या अवकाळी पावसाने कुठे ख़ुशी कुठे गम अशी स्थिती निर्माण झाली. हवामान विभागाने २५ व २६ नोव्हेंबर रोजी अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होताच.
अहमदनगरच्या उत्तर भागातील आश्वी,कोतूळ परिसरात पावसाने चांगली हजेरी लावली नगर शहर व तालुक्यात देखील पाऊस होताच. साधारण पिकाचे भरणे होईल इतका हा पाऊस झाला. राहुरी तालुक्यातील ब्राहाणीसह पूर्व भागात पाऊस झाला.
लोणी परिसरात सुमारे तासभर जोरदार पाऊस झाला. पुणतांबा परिसरात पावसाची रिमझिम सुरूच होती. कोपरगाव तालुक्यातील वारी परिसरात विजाच्या कडकडाटासह रिमझिम सुरू होती. शिर्डीत विजेच्या गडगडाट व वादळासह पावसाने हजेरी लावली.
तर राजूर, भंडारदरा परिसरात गारपीट झाल्याचे वृत्त आहे. नगर तालुक्यात, पारनेर तालुक्यात अनेकठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसला. अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले. तर काही ठिकाणी रबी पिकास जाडं मिळाले.
* आभाळ गरजण्याची विचित्र पद्धत
काही ठिकाणी आभाळ गरजण्याची विचित्र पद्धत पाहायला मिळाली. साधारण आभाळ गर्जतांना मोठा आवाज होऊन काही सेकंदात किंवा मिनिटात हा आवाज बंद होतो. परंतु काही ठिकाणी हा आवाज सलग चार ते पाच मिनिट बारीक आवाजात सुरु होता.
त्यामुळे आता आभाळाने देखील आपली पद्धत बदलली की काय अशी चर्चा नागरिकांत होती.