पिरमिरावली दर्गा यांचे संदल उरुस सार्वजनिक कार्यक्रम कोरोना प्रार्दुभावामुळे रद्द

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-मौजे कापूरवाडी येथील ह.सय्यद इसहाक पिरमिरावली दर्गा पहाड ट्रस्टच्या वतीने सर्व धर्मिय भाविक भक्तांना आवाहन करण्यात येते की, सालाबादप्रमाणे साजरे होणारे संदल व उरुस गुरुवार दि.26 व शुक्रवार दि.27 नोव्हेंबर 2020 रोजी होणारे कार्यक्रम कोविड-19

च्या दुसर्‍या लाटेच्या शक्यतेमुळे शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी यांचे लेखी आदेशाप्रमाणे भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनच्यावतीने कळविल्यामुळे चितळेरोड येथील मिरावली दर्गा येथून निघणारी संदल, फुलांची चादर मिरवणूक तसेच उरुसनिमित्त पहाडावर होणारे महाप्रसाद भंडाराचे आयोजन रद्द करण्यात आले आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दर्गामध्ये दर्शनासाठी (जियारत) येणार्‍या भाविकांनी स्वत:ची काळजी स्वत: घेणे जरुरीचे असल्यामुळे दर्गा परिसरात सोशल डिस्टसिंगचे पालन करुन प्रत्येकाने मास्कचा वापर सक्तीने करणे बंधनकारक आहे.

तसेच 65 वर्षांवरील व्यक्ती, 10 वर्षांखालील बालके व गरोदर महिलांनी कृपया संदल उरुसाच्या दिवशी दर्गा परिसरात पहाडावर येऊ नये. तसेच भाविकांनी गर्दी करु नये.

पहाडावर दि.26 व 27 नोव्हेंबर रोजी अहमदनगर सोशल क्लब फौंडेशन व दर्गा ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने दर्गा येथे 24 तास रुग्णवाहिकेची सोय करण्यात आली आहे.

भाविकांनी गर्दी न करण्याचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन दर्गाचे वंशावळ विश्‍वस्त आसिफ पीरखान पठाण, चेअरमन हाजी अन्वर खान, सय्यद हमीद रुस्तुम, हाजी गोटू जहागिरदार व सर्व खादीम मुजावर यांच्यावतीने करण्यात येत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24