राहात्यात हरबरा पिकासाठी 12 हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :- राहाता तालुक्यात रब्बीच्या नियोजनात सर्वाधिक क्षेत्र हरबरा पिकासाठी आहे. 32 हजार 402 हेक्टर पैकी हरबरा पिकासाठी 12 हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन आहे.

गहु 10.5 हजार हेक्टर क्षेत्रावर नियोजन आहे. रब्बी ज्वारीचे 400 ते 150 हेक्टर क्षेत्राचे नियोजन आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे यांनी दिली. तालुक्यात रब्बीचे क्षेत्र 32 हजार 402 हेक्टर आहे. या क्षेत्रावर रब्बी हंगामातील विविध पिकांचे नियोजन करण्यात आले आहे.

तसेच तालुक्यातील पुर्वभागातील रामपुरवाडी, नपावाडी भागात रब्बी ज्वारीचे पीक घेतले जाते. चारा पिकासाठी मकाची 8 हजार हेक्टरवर पेरणी होते. कांद्याची लागवडही 2.5 ते 3 हजार हेक्टरवर होते. फळबागांचा विमा शेतकर्‍यांनी उतरावा रब्बी हंगामातील पिकांचा व फळबागांचा विमा शेतकर्‍यांनी उतरावा.

राहाता तालुक्यात 450 हेक्टर क्षेत्रावर द्राक्षांची लागवड करण्यात आली आहे. द्राक्षे पिकांच्या विम्याची मुदत 15 आक्टोबर असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांनी द्राक्षे पिकाचा विमा उतरावा असे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. खतांची टंचाई भासणार नाही… हरबरा, गहु , मका व अन्य चारा पिकांसाठी लागणार्‍या खतांचे नियोजनही करण्यात आले आहे.

युरिया, डिएपी, मिक्स खते व अन्य लागणार्‍या खतांचे नियोजन करण्यात आले आहे. या खतांची शेतकर्‍यांना टंचाई भासणार नाही.