राहुरी :- तालुक्यातील मंडलिकवस्ती येथील शेतातील उभ्या पिकासह झाडे व ठिबक सिंचनची २१०० फुटांची पाइपलाइन अज्ञात व्यक्तींनी पेटवली. त्यामुळे नुकसान झाले. या प्रकरणी खंडू पांडुरंग शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
रविवारी सायंकाळी ६ वाजता ही घटना घडली. शिंदे यांची वांबोरी-डोंगरगण मार्गावर डोंगराच्या पायथ्याशी शेतजमीन आहे. या जमिनीत मठाचे पीक काढणीसाठी आले होते. तेथे आवळ्याची झाडे व ठिबक सिंचन संच पसरवलेला होता.
अज्ञात व्यक्तींनी पिकाला काडी लावल्याने हातातोंडाशी आलेले ३० गुंठे मठाचे पीक, आवळ्याची झाडे व ठिबकचे पाइप आगीच्या भक्ष्यस्थानी पडून खाक झाले. माहिती मिळताच शेतकरी शिंदे शेतात झाले.
मात्र, उभे पीक व मशागतीची साधने जळून खाक झाल्याचे पाहण्याची दुर्दैवी वेळ त्यांच्यावर आली. पुढील तपास हेड काॅन्स्टेबल दिनेश आव्हाड करत आहेत.