अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:-देशभरात कोरोनाचे संक्रमण वाढू लागल्याचे आकडेवारीतून स्पष्ठ होत आहे. यामुळे सर्वत्र प्रशासन सतर्क झाले आहे. नुकतेच जिल्ह्यातील वाढत्या कोरोना आकडेवारीमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
तसेच नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अकोले शहरात काल शिवजयंती च्या दिवशी तहसीलदार, गटविकास अधिकारी,
पोलीस निरीक्षक, मुख्याधिकारी यांचेसह कर्मचारी यांनी थेट रस्त्यावर उतरून विना मास्क फिरणार्या दुचाकी व चारचाकी वाहन चालकांवर कारवाई चा बडगा उगारला. या धडक कारवाई चे नागरिकांतून स्वागत होत आहे.
रस्त्यावरून विना मास्क फिरणार्या दुचाकी व चारचाकी वाहन चालकांना थांबवून त्यांचे कडून दंड वसूल केला जात होता. वाहनचालकांना दररोज मास्क लावण्याच्या सूचना करण्यात येत होत्या.
या कारवाई मुळे नागरिकांतुन समाधान व्यक्त केले गेले. करोनाच्या काळात किंवा लॉकडाऊन च्या कालावधी मध्ये कडक नियम केले होते तेच नियम पुन्हा प्रशासन कडकपणे राबवत असतांना दिसत आहे. वाहनचालक व नागरिक यांनी या नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.